- ईमेल mspspune28@gmail.com
- फोन नं (02169) 265255
समाजातील भटक्या विमुक्त जाती व जमाती, अनुसूचित जाती व जमाती तसेच इतर मागास व विशेष मागास प्रवर्ग या मुलामुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उदात्त हेतून सन 1980 साली मांगल्य शिक्षण प्रसारक संस्था, पुणे-28 या संस्थेची कै.आनंदा धोंडीबा सुर्यवंशी यांनी स्थापना केलेली आहे. शासनाच्या तत्कालीन समाज कल्याण विभागांतर्गत प्रथम लोणंद येथे समता प्राथमिक आश्रमशाळा सुरू करून यामध्ये भटक्या विमुक्त जाती जमातीमधील तसेच निराधार मुलांना प्रवेश देऊन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम संस्थेमार्फत सुरू करण्यात आले.
इ.7 वी नंतर पुढील शिक्षणाची गरज लक्षात घेता सन 1993 पासून समता माध्यमिक आश्रमशाळेची स्थापना करून समाजातील वंचित घटकांतील मुलामुलींना शिक्षण देण्याचा व त्या मुला-मुलींचे भावी आयुष्य उज्वल करण्याचे कार्य संस्थेमार्फत सुरू केले आहे. आजपर्यंत संस्थेतील या विद्यालयाने एस.एस.सी व एच.एस. सी परीक्षेच्या निकालाची उज्वल परंपरा राखली आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर मुलभूत व चांगल्या सुविधा देवून त्यांच्यामध्ये शिक्षणाची गोडी वाढवून स्पर्धेच्या युगामध्ये टिकून राहण्यासाठी व उदयाचे सक्षम नागरिक निर्माण करण्याचे कार्य संस्थेमार्फत अखंड चालू आहे. आश्रमशाळेमध्ये विमुकत जाती, भटक्या जमातीतील मुला- मुलींना निवास व शिक्षणाची सोय होत होती. परंतु मागासवर्गीय व इतर जातीतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा विचार करून कै.आनंदा धोंडीबा सुर्यवंशी यांनी संस्थेमार्फत जिल्हा परीषद समाज कल्याण विभागांतर्गत मागासवर्गीय मुलांची वसतिगृह सन 1988 पासून सुरू केली.
संस्थेने या प्राथमिक/माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालयास सुसज्य इमारत, सुसज्य ग्रंथालय व अद्यावत प्रयोगशाळा या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबर सर्वांगीण विकासाचे ध्येय उराशी बाळगुन त्यासाठी सतत प्रयत्न केले जातात यासाठी विविध उपक्रमांतर्गत व्यक्तिमत्व विकास, क्रिडा स्पर्धा यांचे आयोजन केले जाते. यामुळे अनेक राष्ट्रीय खेळाडू निर्माण केले आहे. आश्रमशाळा व वसतिगृहासाठी सर्व सोयीयुक्त वसतिगृह इमारतींची उभारणी करून समाजातील गोरगरीब व शिक्षणापासून वंचित राहत असलेल्या मुलां-मुलींना निवास व शिक्षणाची सोय केली.
संस्थेचा नोंदणी क्रमांक.
1.मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 अन्वये नोंदणी क्रमांक.F1514/पुणे/1980 नोंदणी दि.25/07/1980
2.सोसायटी रजिस्ट्रेशन अक्ट 1860 नुसार एमएएच/439/पुणे/80 नोंदणी दिनांक.30/05/1980