- ईमेल mspspune28@gmail.com
- फोन नं (02169) 265255
प्राथमिक आश्रमशाळा-
सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन यांचे वतीने देण्यात येणारा सन 2003- 04 मधील राज्यात प्रथम क्रमांकाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्राविण्य पुरस्कार संस्थेच्या समता प्राथमिक आश्रमशाळा पाडेगाव यांना प्राप्त झाला. रोख रूपये पाच लाख, स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून हा पुरस्कार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना.विलासरावजी देशमुख, सामाजिक न्यायमंत्री मा.ना.चंद्रकांतजी हांडोरे मा.ना.धर्माबाबा आत्राम, मा.संचालक श्री.देवरा व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत दिनांक 26 जुलै 2005 रोजी राजर्षि शाहू महाराज सामाजिक न्याय दिनानिमित्त मुंबई येथे प्रदान करण्यात आला.
वसतिगृह पुरस्कार-
सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन यांचे वतीने देण्यात येणारा सन 2003- 04 मधील पुणे विभागात प्रथम क्रमांकाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्राविण्य पुरस्कार संस्थेच्या मागावर्गीय मुलांचे वसतिगृह शाखा नं.2 पाडेगाव यांना प्राप्त झाला. रोख रूपये एक लाख, स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून हा पुरस्कार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना.विलासरावजी देशमुख, सामाजिक न्यायमंत्री मा.ना.चंद्रकांतजी हांडोरे मा.ना.धर्माबाबा आत्राम, मा.संचालक श्री.देवरा व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत दिनांक 26 जुलै 2005 रोजी राजर्षि शाहू महाराज सामाजिक न्याय दिनानिमित्त मुंबई येथे प्रदान करण्यात आला.
शिक्षक पुरस्कार-
विभागीय समाजकल्याण अधिकारी कार्यालय, पुणे विभाग पुणे यांचे वतीने सन 2009-10 या शैक्षणिक वर्षात देण्यात आलेला सातारा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार समता प्राथमिक आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका कु.वाघमारे विमल माणिकराव यांना मिळाला. हा पुरस्कार पुणे विभागाचे संचालक मा.श्री.ए.झेड खोब्रागडे, विभागीय समाज कल्याण अधिकारी मा.उमाकांत कांबळे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पुणे येथे प्रदान करण्यात आला.
संस्था पुरस्कार-
मांगल्य शिक्षण प्रसारक संस्थेस महाराष्ट्र शासनाने समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आर्थिंकदृष्टया विकास होण्यासाठी सामाजिक, कलात्मक व साहित्यिक क्षेत्रांत केलेल्या कार्याबद्दल लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुरस्कार 2012-13 रोख रूपये पंन्नास हजार, शाल,श्रीफळ, सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.