- ईमेल mspspune28@gmail.com
- फोन नं (02169) 265255
|| प्रयत्नांती परमेश्वर ||
मांगल्य शिक्षण प्रसारक संस्था पुणे-28 संचलित
समता प्राथमिक आश्रमशाळा, पाडेगांव ता.खंडाळा जि.सातारा
श्री. भोसले संदिप मोहन- प्र.मुख्याध्यापक मो.नं. 8055188877
सौ.अडागळे सुनिता तुषार - महिला अधिक्षिका - मो.नं. 9762372850
U-Dise Code- 27310506602
स्थापना- सन 1981
इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा मान्यताबाबतचा शासन निर्णय क्र-.व्हीअेअेस/1081/42166/डे.15 मंत्रालय विस्तारभवन, मुंबई-400032 दि.25/03/1981
सचिवालय- मा.प्रधान सचिव, इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय महाराष्ट्र शासन मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई-400032.
संचालनालय- मा.संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय 3 चर्च पथ महाराष्ट्र राज्य पुणे-411001.
विभागीय कार्यालय- मा.प्रादेशिक उपसंचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग पुणे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर,सामाजिक न्याय भवन विश्रांतवाडी पोलिस स्टेशन समोर मेंन्टल कॉर्नर येरवडा पुणे-411006.
जिल्हा कार्यालय-
मा.सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण सातारा
डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा-415003
मांगल्य शिक्षण प्रसारक संस्था पुणे-28 या संस्थेने पुर्वी समाज कल्याण संचालनालय व आत्ताचे इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मान्यतेने सन 1981 पासून लोणंद येथे प्रथम समता प्राथमिक आश्रमशाळा सुरू केली. सन 1989 साली पाडेगाव ता.खंडाळा जि.सातारा येथे जागा व इमारत उपलब्ध करून समता प्राथमिक आश्रमशाळा. पाडेगाव ता.खंडाळा जि.सातारा येथे स्थलांतरीत करण्यात आली. सध्या समता प्राथमिक आश्रमशाळेमध्ये इ.1 ली ते इ.4 थी चे वर्ग सुरू आहेत. प्राथमिक आश्रमशाळेमध्ये निवासी मान्य संख्या- 70 विद्यार्थी इतकी आहे. समता प्राथमिक आश्रमशाळेमध्ये निवासी व अनिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. प्राथमिक विभागाठी 4 शिक्षक कार्यरत आहेत. समता प्राथमिक आश्रमशाळा वसतिगृह विभागासाठी 1 अधिक्षक, 1स्वयंपाकी, 1 मदतनीस व 1 कामाठी अशी 4 पदे वसतिगृह विभागामध्ये कार्यरत आहेत.
समता प्राथमिक आश्रमशाळा व वसतिगृहासाठी स्वतंत्र व सुसज्य अशी इमारत उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत शिष्यवृत्ती, क्रिडास्पर्धा व त्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष देण्यात येते. आश्रमशाळेसाठी स्वतंत्र वर्ग खोल्या, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंच, ग्रंथालय, संगणक, पिण्यासाठी आर. ओ चे शुध्द पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
समता प्राथमिक आश्रमशाळा वसतिगृह विभागामध्ये विद्यार्थ्यांना निवास व्यवस्था यामध्ये अंथरून- पांघरून यांमध्ये कॉट, गादी, उशी, सतरंजी, चादर/ब्लॅकेट, भोजनाची भांडी यांमध्ये ताट, वाटी, पेला, शैक्षणिक साहित्य यांमध्ये पाठयपुस्तक, वही, पेन, पाटी, पट्टी, शिसपेन्सिल, खोडरबर, शॉपनर, दप्तर इत्यादी साहित्य मोफत पुरविण्यात येते. विद्यार्थ्यांना दोन शालेय गणवेश देण्यात येतात तसेच केसकर्तन, तेल, साबण, दंतमंजन, प्रथमोपचार, करमणूक व खेळाचे साहित्य पर्यायी विद्युत व्यवस्था, सुरक्षेतेसाठी सी.सी.टी.व्ही इत्यादी सुविधा पुरविण्यात येतात. पिण्यासाठी आर. ओ चे शुध्द पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
प्राथमिक आश्रमशाळेस सन 2003-04 मध्ये इतर मागास बहुजन कल्याण विभागा अंतर्गत महाराष्ट्रामध्ये कार्यरत असलेल्या सर्व आश्रमशाळेमधून समता प्राथमिक आश्रमशाळेला राज्यात प्रथम क्रमांकाचा सामाजिक न्याय विभागामार्फत देण्यात येणारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्राविण्य पुरस्कार प्राप्त झाला आहे.
अ) अध्यापक वर्ग
अ.क्र | नाव | शै.पात्रता | नेमणूक तारीख | जन्म तारीख | पद |
1 | श्री.भोसले संदिप मोहन | B.A,D.ed | 06.02.2023 | 03.09.1991 | प्र.मुख्याध्यापक |
2 | भंगारे गयाबाई शेषेराव | B.A,D.ed | 15.06.2023 | 02.05.1989 | उपशिक्षिका |
ब) वसतिगृह कर्मचारी वर्ग
अ.क्र | नाव | शै.पात्रता | नेमणूक तारीख | जन्म तारीख | पद |
1 | श्री.भोसीकर सुनिल दशरथ | SSC | 08.07.2019 | 03.07.1983 | स्वयंपाकी |
2 | श्री.दुधाळ सचिन विठ्ठल | B.Com | 13.02.2020 | 17.07.1992 | मदतनीस |
3 | श्री.सुर्यवंशी संग्राम मरीबा | SSC | 01.04.2002 | 15.05.1975 | कामाठी |