- ईमेल mspspune28@gmail.com
- फोन नं (02169) 265255
|| प्रयत्नांती परमेश्वर ||
मांगल्य शिक्षण प्रसारक संस्था पुणे-28 संचलित
मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह शाखा नं.1 पाडेगाव ता.खंडाळा जि.सातारा.
श्री.अवघडे शिवाजी आनंदराव - अधिक्षक - मो.नं. 9922320398
स्थापना- सन 1988
1. मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा जिल्हा परिषद सातारा यांचा आदेश क्र.स.क-2- वसि-769-88 सातारा जिल्हा परिषद विभाग समाज कल्याण सातारा यांच्या दि.21/03/1988 च्या आदेशानुसार वसतिगृह प्रथम शिरवळ ता.खंडाळा जि.सातारा येथे सुरू करण्यास परवानगी मिळाली.
2. वसतिगृह शिरवळ येथून पाडेगाव येथे स्थलांतरास परवानगीचा आदेश क्र.जा.न.सक/3/कावि /2171/89 सातारा जिल्हा परिषद विभाग समाज कल्याण सातारा यांच्या दि.25/09/1989 चा आदेश.
सचिवालय - मा.प्रधान सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, महाराष्ट्र शासन मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई-400032.
आयुक्तालय- मा.आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे. 3 चर्च रोड, पुणे-411001
विभागीय कार्यालय- मा.प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण पुणे विभाग पुणे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर,सामाजिक न्याय भवन विश्रांतवाडी पोलिस स्टेशन समोर मेंन्टल कॉर्नर येरवडा पुणे-411006
जिल्हा कार्यालय- मा.जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद सातारा, सातारा-कोरेगाव रोड, जिल्हा परिषद सातारा-415001
महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागांतर्गत इ.5 वी ते इ.12 वी च्या मागासवर्गीय मुलांसाठी चालविण्यात येणा-या निवासी वसतिगृह योजनेतून संस्थेने सन 1988 साली शिरवळ ता. खंडाळा जि.सातारा येथे प्रथम वसतिगृह सुरू केले. त्यानंतर शासनाच्या परवानगीने सन 1989 रोजी सदर वसतिगृह पाडेगाव ता. खंडाळा जि.सातारा येथे स्थलांतरीत केले. मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह शाखा नं.1 पाडेगाव ता.खंडाळा जि.सातारा या वसतिगृहाची मान्य संख्या- 120 असून यामध्ये 60% एस सी, 15% एस टी, विमुक्त जाती भटक्या जमाती 23%, विशेष मागास प्रवर्ग 7.5% व आर्थिकदृष्टया मागास 2.5% प्रमाणे जातीनिहाय विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
मागासवर्गीय मुलांचे वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निवास व्यवस्था यामध्ये अंथरून- पांघरून यांमध्ये कॉट, गादी, उशी, सतरंजी, चादर/ब्लॅकेट, भोजनाची भांडी यांमध्ये ताट, वाटी, पेला, शैक्षणिक साहित्य यांमध्ये पाठयपुस्तक, वही, पेन, पट्टी, शिसपेन्सिल, खोडरबर, शॉपनर,कंम्पास, दप्तर इत्यादी साहित्य मोफत पुरविण्यात येते. विद्यार्थ्यांना दोन शालेय गणवेश संस्थेमार्फत देण्यात येतात तसेच केसकर्तन, तेल, साबण, दंतमंजन, प्रथमोपचार, करमणूक व खेळाचे साहित्य पर्यायी विद्युत व्यवस्था, सुरक्षेतेसाठी सी.सी.टी.व्ही इत्यादी सुविधा पुरविण्यात येतात. पिण्यासाठी आर. ओ चे शुध्द पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह शाखा नं.1 यांमध्ये 1 अधिक्षक, 2 स्वयंपाकी, 1 मदतनीस व 1 चौकीदार अशी 5 कर्मचारी कार्यरत आहेत.
वसतिगृह कर्मचारी वर्ग
अ.क्र | कर्मचा-याचे नाव | पद | जन्म तारीख |
1 | श्री.अवघडे शिवाजी आनंदराव | अधिक्षक | 01.05.1968 |
2 | सौ. काकडे शोभा दादासो | स्वयंपाकी | 01.01.1975 |
3 | सौ. जाधव लक्ष्मी तुकाराम | स्वयंपाकी | 01.01.1978 |
4 | श्रीमती.लोखंडे सुरेखा नथुराम | मदतनीस | 01.01.1971 |
5 | श्री.जाधव तुकाराम मच्छिंद्र | चौकीदार | 01.06.1965 |
मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह शाखा नं.1 पाडेगाव ता.खंडाळा जि.सातारा
मान्य विद्यार्थी संख्या = 120
अ.क्र | संवर्ग | विहीत केलेली टक्केवारी | टक्केवारी प्रमाणे आरक्षित जागा |
1 | अनु.जाती | 60% | 60 |
2 | अनु.जमाती | 15% | 15 |
3 | विमुक्ती जाती/भटक्या जमाती | 23% | 23 |
4 | विशेष मागास प्रवर्ग | 2% | 2 |
5 | इतर मागास प्रवर्ग | 72% | 15 |
6 | आर्थिकदृष्टया मागास प्रवर्ग | 25% | 5 |
एकूण | 120 |